सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या सहकार्यातून रक्तदान शिबीर यशस्वीपणे

    मोहोळ : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अंकोली येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या सहकार्यातून हे रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले.

    हे शिबीर जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ मस्के, अजित कुलकर्णी, जमीरभाई शेख, प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना मोहोळ तालुका प्रमुख आबासाहेब गुरव व तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले.

    यावेळी सोपान वनारे, मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे, सरपंच पांडुरंग येळवे, दशरथ रणदिवे, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अतुल गुरव, श्रेयस कामतकर, संतोष फाटे, धनाजी कुलकर्णी, देवानंद भगरे, माऊली भगरे, संपत अडसूळ, योगेश पुजारी, जितेश कामतकर, बंडु माळी, नितिन माळी, बबलु गुरव, राहुल फाटे, संदीप कोकाटे आदी उपस्थित होते.

    गावात एक महिन्या आधी रक्तदान शिबिर होऊन ही या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार नानासाहेब ननवरे यांनी मानले आहेत.