अशी ही कृतज्ञता ! लाडक्या ‘बैलाची’ बांधली समाधी ; रिधोरेत साजरी होते दरवर्षी बैलाची पुण्यतिथी

बैल पोळ्याच्या सणादिवशी प्रवर्चन तर पूर्वसंध्येला" राजा बैलाचा"पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो.ही पुण्यतिथी नुकतीच कीर्तनसोहळ्याने संपन्न झालीय.धनाजी गायकवाड व त्यांचे कुटुंबीय शेतात बांधलेल्या समाधीचे दर्शन घेऊन पुजा करतात.शेतकरी गायकवाड यांचा राजा नावाच्या बैलाचा आजारपणामुळे मृत्यु झाला होता.

    संदीप शिंदे , माढा : अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या मालकाचं ओझ खांद्यावर घेऊन शेतकामात मदत करणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस अर्थात “बैल पोळा”.माढा तालुक्यातील रिधीरे गावच्या धनाजी भानुदास गायकवाड या शेतकर्याने आपल्या मृत्यु पावलेल्या लाडक्या “बैलाची”शेतात समाधी बांधली आहे आणि दरवर्षी हे कुटूंब बैलाची पुण्यतिथी साजरी करीत आहे.

    १० वी पुण्यतिथी नुकतीच कीर्तन सोहळ्याने पार पडली
    बैल पोळ्याच्या सणादिवशी प्रवर्चन तर पूर्वसंध्येला” राजा बैलाचा”पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो.ही पुण्यतिथी नुकतीच कीर्तनसोहळ्याने संपन्न झालीय.धनाजी गायकवाड व त्यांचे कुटुंबीय शेतात बांधलेल्या समाधीचे दर्शन घेऊन पुजा करतात.शेतकरी गायकवाड यांचा राजा नावाच्या बैलाचा आजारपणामुळे मृत्यु झाला होता.मृत्यु झालेल्या दुसऱ्याच दिवशी गायकवाड कुटुंबाने राजाची समाधी बांधली.नित्यनियमाने दररोज दर्शन व पूजा करुन दिवसांची सुरुवात गायकवाड कुटूबिंय करतात.दरवर्षी बैलाची पुण्यतिथी साजरी देखील केली जाते.यंदा देखील बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला ही पुण्यतिथी साजरी झाली.यावेळी धनाजी गायकवाड यानी राजा बैलाच्या आठवणी मांडल्या.बैलाविषयी रिधोरेच्या गायकवाड कुटूबियांनी दाखविलेली कृतज्ञता निश्चितच वाखाणण्याजोगी अशीच आहे.

    माझ्या कुटूबांच्या प्रगतीत राजा बैलाचे फार मोठे योगदान आहे.माझ्या बरोबर पंढरीच्या वारीला राजा येत असायचा.आजाराने त्यांचा मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या दुसर्याच दिवशी शेतात बैलाची समाधी उभारली.आम्ही दररोज समाधीचे दर्शन व पुजा करुनच दिवसाची सुरुवात करतो.यंदाची १० वी पुण्यतिथी साजरी केली.प्रवचन सोहळा साजरा करणार आहोत.

    -धनाजी गायकवाड,शेतकरी रिधोरे ता.माढा