suicide

तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलेल्या या मुलीच्या नातेवाईकांना पाच दिवसांनंतर तिनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडलीय. एका वहीत तिनं या छेडछाडीबद्दल लिहून ठेवलं होतं. या चिठ्ठीत सुरुवातीलाच तिनं भारत मातेची आणि आपल्या आईवडिलांची माफी मागितलीय. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये तीन तरुण सातत्यानं करत असलेल्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्येचं पाऊल उचललं. ७ डिसेंबरला ही दुर्घटना घडली होती. या घटनेतील सुसाईट नोट आता पोलिसांना मिळालीय.

तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलेल्या या मुलीच्या नातेवाईकांना पाच दिवसांनंतर तिनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडलीय. एका वहीत तिनं या छेडछाडीबद्दल लिहून ठेवलं होतं. या चिठ्ठीत सुरुवातीलाच तिनं भारत मातेची आणि आपल्या आईवडिलांची माफी मागितलीय. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.

आपलं सैन्यात जाण्याचं स्वप्न असल्याचं तरुणीनं या चिठ्ठीत लिहून ठेवलंय. याच चिठ्ठीत तिनं तीन आरोपींची नावंदेखील लिहिली आहेत. १७ वर्षांच्या या तरुणीनं घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. तिचे वडील हे वाहनांच्या चाकांचं पंक्चर काढण्याचं दुकान चालवतात. अचानक आपल्या लेकीनं असं पाऊल उचलल्यामुळं कुटुंबावर शोककळा पसरलीय.

या तरुणांनी आपली सातत्यानं छेड काढली. शिवाय आपला हात पकडून ही बाब कुणालाही न सांगण्याची धमकी दिली, असं या चिठ्ठीत लिहिलं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सैन्यात दाखल होण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र तरुणांच्या छेडछाडीमुळं आपलं हे स्वप्न अपुरं राहिल्याची खंत तिनं व्यक्त केलीय.