कृषी स्वावलंबन, कृषी क्रांती योजनांचा लाभ घ्या; कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून आवाहन

    सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवीन विहीर आणि इतर बाबींचा लाभ देण्यात येतो. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईनद्वारे प्राप्त अर्जामधून लॉटरी पद्धतीने निवड करून अनुदानाचा लाभ देण्यात येतो. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवीन विहीर आणि इतर बाबींचा लाभ देण्यात येत आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईनद्वारे प्राप्त अर्जामधून लॉटरी पद्धतीने निवड करून अनुदानाचा लाभ देण्यात येतो. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.