solapur Zp

सांगोला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमनी यांची सोलापूर जिल्हा आरोग्य विभागामध्ये बदली झाली होती. यामुळे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. संदीप देवकते यांच्याकडे सांगोल्याचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता. ऐन कोरोना काळात तडकाफडकी बदली झाल्याने यावरून चांगलीच चर्चा रंगू लागली होती.

    सांगोला : कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने उक्त आदेशान्वये सांगोला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा दोडमनी यांची सोलापूर येथे झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा एकदा सांगोला तालुका आरोग्य अधिकारी म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे. तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद यांच्या वतीने देण्यात आले आहेत.

    सांगोला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमनी यांची सोलापूर जिल्हा आरोग्य विभागामध्ये बदली झाली होती. यामुळे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. संदीप देवकते यांच्याकडे सांगोल्याचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता. ऐन कोरोना काळात तडकाफडकी बदली झाल्याने यावरून चांगलीच चर्चा रंगू लागली होती. परंतू आवघ्या ३ ते ४ दिवसात सदर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या बदली बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी निर्णय बदलून सांगोला तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. सिमा दोडमणी यांच्याकडेच पुन्हा पदभार सोपवण्यात आला आहे