कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये उद्यापासून दहा दिवस संचारबंदी

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने उद्यापासून दहा दिवसांसाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केली.
  • हॉस्पिटल, मेडिकल, वृत्तपत्र आणि अनेक प्रकारच्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय
  • कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने हा संचारबंदी आणि लॉकडाऊनचा महत्त्वाचा निर्णय

कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने उद्यापासून दहा दिवसांसाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. तसेच हा लॉकडाऊन १६ जुलै ते २६ जुलैपर्यंत राहणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सोलापूर शहरातील पोलिस प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये बैठका घेण्यात आल्यानंतर, पोलिस प्रशासन देखील आता सज्ज झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटल, मेडिकल, वृत्तपत्र आणि अनेक प्रकारच्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आदेशाचे उल्लंघन केल्यास नागरिकांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. 

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर मार्च ते मे या अडीच महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळात शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच संचारबंदी उठवल्यानंतर भाजी मंडई, भाजी विक्रेते आणि अन्य दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु आता दिवसागणिक कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने हा संचारबंदी आणि लॉकडाऊनचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.