कळमण येथील हायस्कूलमध्ये दहा विद्यार्थी कोरोनाबाधित, पालकांमध्ये अस्वस्थता; वैद्यकीय अधिकारी शाळेला भेट देणार

शाळेमध्ये आज मी गटशिक्षणाधिकारी जाऊन भेट देणार आहोत. भेटीनंतरच योग्य तो तपशील मिळेल. असं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलं.

    सोलापूर : राज्यात कोरोनाचा उद्रेक झपाट्याने वाढत आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र राज्यातील अनेक विद्यार्थीही या कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे.

    दरम्यांन सोलापूर जिल्ह्यातील कळमण येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये दहा विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. याला तालुका गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांनी दुजोरा दिला आहे. आज या शाळेमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी स्वतः जाऊन भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

    तसेचं ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याना शाळेक बोलवून अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

    वैद्यकीय अधिकारी शाळेला भेट देणार

    त्यामुळे दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांबाबतही सरकारने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. या महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहेत. त्यांना सध्या शाळेत बोलावून फारसे काही साध्य होणार नाही. या विद्यार्थ्यांना घरी बसूनच अभ्यास करायला लावणे येग्य ठरेल. त्यामुळे याबाबत शासनाने लवकरच योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. कळमणच्या महात्मा गांधी विद्यालयात सात विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे माहिती समोर आली आहे. दरम्यान याचं पार्श्वभूमीवर शाळेमध्ये आज मी गटशिक्षणाधिकारी जाऊन भेट देणार आहोत. भेटीनंतरच योग्य तो तपशील मिळेल. असं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलं.