निवडणुकीसाठी मेहनत घेणाऱ्यांचे आभार; अपयशानंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. या निवडणुकी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची लढाई बनली होती. भाजपाने ही जागा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना खेचून आणली आहे. पराभव मान्य करत राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी अपयशावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. या निवडणुकी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची लढाई बनली होती. भाजपाने ही जागा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना खेचून आणली आहे. पराभव मान्य करत राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी अपयशावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    या निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो असे जयंत पाटील म्हणाले.
    महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली, मात्र दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्‍यांतील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी पराभव झाला असे त्यांनी मान्य केले.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केरळ येथे तीन तर महाराष्ट्र येथे एका जागेवर निवडणूक लढवली होती. केरळात दोन ठिकाणी आम्ही यशस्वी ठरलो तर महाराष्ट्रातील मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो असेही पाटील म्हणाले.

    राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. यामुळे येथे पोटनिवडणुक घेण्यात आली. या एका जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. भाजपचे समाधान आवताडे हे ३५०३ इतके मताधिक्‍य मिळवून विजय झाले आहेत. समाधान आवताडे यांना १,०७७७१ मते, तर भगीरथ भालके यांना १,०४२७१ मते मिळाली आहेत. निवडणूक निकालानंतर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून एकच जल्लोष केला.