…तेव्हा विरोधकांनीही दिला होता पाठिंबा : शिवतेजसिंह मोहिते-पाटील

    अकलूज/कृष्णा लावंड : २०१८ मध्ये जेव्हा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली, तेव्हा सर्वच विरोधकांनी एकमुखाने पाठिंबा दिला होता. आता आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोध केला जात असल्याचे शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी उपोषणस्थळावरुन सांगितले. आम्ही प्रथम अकलूजचे नागरिक आहोत, नंतर पत्रकार असे म्हणत आज अनेक पत्रकारांनी उपोषण करत नगरपरिषदेच्या मागणीला पाठिंबा देत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.

    अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर होण्यासाठी शासनाकङून अङथळा निर्माण केला जात आहे. त्यासाठी दोन्ही गावचे नागरिक प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत.

    शिवतेजसिंह पुढे म्हणाले, १९७८ साली अकलूजला टाऊन प्लॅनिंग आले आहे. परंतु पुरेशा निधी अभावी आखून दिलेली कामे करणे शक्य होत नाही. वाढती लोकसंख्या लक्षात घेता इतर विकासकामांनाही निधी अपुरा पडत आहे. विरोधक गावठाणाती जागा वाटपावरुन आमच्यावर टीका करत आहेत. परंतु, सदर जागा महसूल विभागाकङून अद्याप आमच्या ताब्यात आलीच नाही आणि या गावठाणातील मूळ मालकांनी न्यायालयात धाव घेतल्याने संपूर्ण गावठाण अद्याप ग्रामपंचायतीच्या ताब्यात आले नाही.

    ही बाब न्यायप्रविष्ठ असताना आम्ही जागेचे वाटप कसे करणार. दुसरा आरोप दोन गावांना पाणी वाटपाचा होत आहे. तर, अकलूजची पाणीपुरवठा योजना सुरुवातीपासूनच संयुक्त होती. त्यामुळे अकलूजसह यशवंतनगर व संग्रामनगरला पाणी देणे क्रमप्राप्त आहे. अकलूज नगर परिषद झाल्यानंतर यशवंतनगर व संग्रामनगरची पाणी पुरवठा योजना स्वतंत्र होईल.

    सध्या निधी अभावी ३५ लाख रुपये विजबील थकीत आहे. त्यामुळे नाईलाजाने ग्रामपंचायतीचे २० बोअर बंद ठेवावे लागत आहेत. तीनही गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी अकलूज ग्रामपंचायतीला वर्षाला सुमारे दीङ कोटी रुपये खर्च करावे लागतात. नगर परिषदेची मंजूरी तातङीने मिळाली नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत. अकलूज, माळेवाङी व नातेपुतेच्या नागरिकांच्या भावनांचा विचार करुन शासनाने त्वरित मंजूरी द्यावी.