सभापती रजनी भडकूंबे , बीडीओ डॉ.जास्मीन शेख
सभापती रजनी भडकूंबे , बीडीओ डॉ.जास्मीन शेख

उत्तर सोलापूर सभापती रजनी भडकूंबे आणि बीडीओ डॉ.जास्मीन शेख यांच्यात अनेक दिवसापासून दैनंदीन प्रशासकीय कामकाजावरुन वाद होत आहेत. पं.स.सभेच्या ठरावात बीडीओ डॉ.शेख यांनी मनमानी करित फेरफार केला आहे. सभेस सदस्य गैरहजर असल्याचा शेरा असताना तो खोडून हजर असल्याचा शेरा बीडीओनी मारला , त्यामूळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सभापती भडकूंबे यांनी केला आहे.

    सोलापूर : तुमच्या बीडीओमूळे कार्यालयीन वातावरण दुषित होत असल्याची कैफियत उत्तर सोलापूर पंचायात समिती सभापती रजनी भडकूंबे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांच्या समोर मांडली.

    उत्तर सोलापूर सभापती रजनी भडकूंबे आणि बीडीओ डॉ.जास्मीन शेख यांच्यात अनेक दिवसापासून दैनंदीन प्रशासकीय कामकाजावरुन वाद होत आहेत. पं.स.सभेच्या ठरावात बीडीओ डॉ.शेख यांनी मनमानी करित फेरफार केला आहे. सभेस सदस्य गैरहजर असल्याचा शेरा असताना तो खोडून हजर असल्याचा शेरा बीडीओनी मारला , त्यामूळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सभापती भडकूंबे यांनी केला आहे. या पुर्वी विविध कर्मचारी संघटनेनी बीडीओ डॉ.जास्मीन शेख यांच्या विरोधात तक्रार सीईओंकडे केली होती.

    या सर्व पार्श्वभूमी सीईओ दिलीप स्वामी आणि प्रशासन डेप्युटी सीईओ परमेश्वर राऊत यांनी उत्तर सोलापूर पंचायात समिती कार्यालयात भेट घेत. सभापती अन् बीडीओ यांचे म्हणणे ऐकून घेतले. सभापती सदस्यांमध्ये समन्वय राखण्याचा सल्ला सीईओ स्वामी यांनी बीडीओ यांना दिला..दरम्यान या सगळ्या घडामोडीवर काय कारवाई होणार याची चर्चा जि.प.मुख्यालयात कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती.

    सुमारे एक तास बीडीओंची चौकशी करण्यात आली. बीडीओ यांच्या कार्यप्रणाली मूळे कार्यालयीन वातावरण दुषित होत असल्याची कैफीयत सीईओं समोर मांडली आहे.

    -रजनी भडकूंबे,सभापती, उत्तर सोलापूर पंचायात समिती