रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिलेल्या आशीर्वादाने भारावले नववधूवर

पंढरपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.त्यांच्यावर प्रेम करणारे राज्यात लाखो चाहते आहेत. अशाच एका आपल्या चाहत्याला रस्त्यात गाडी उभी करून शरद पवार यांनी लग्नानिमित्त भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंढरपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.त्यांच्यावर प्रेम करणारे राज्यात लाखो चाहते आहेत. अशाच एका आपल्या चाहत्याला रस्त्यात गाडी उभी करून शरद पवार यांनी लग्नानिमित्त भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांनी दाखवलेल्या या प्रेमाने नव वधूवर भारावून गेले.

पंढरपुरातील गादेगाव येथील सुरज नवनाथ शिंदे आणि पुण्यातील उरळी कांचन येथील काजल हरी क्षिरसागर यांचा १७ डिसेंबर रोजी गादेगाव येथे विवाह सोहळा पार पडला. यानंतर हे नवदांपत्य ग्रामदैवत दर्शनाला जात होते, तेव्हा शरद पवार पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे येणार असल्याची माहिती मिळाताच सुरज आणि काजोल हे दोन्ही नव विवाहित्य जोडपे पवारांच्या भेटीसाठी सरकोली गावी आले होते.

दरम्यान, पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना सरकोली येथे जाता आले नाही म्हणून ते आंबे गावाजवळील रस्त्यावर पवारांची वाट पाहत थांबले होते. पवारांच्या गाड्यांचा ताफा येतान शिंदे यांनी हात दाखवला. पवारांनीही आपली गाडी थांबवून आधिक चौकशी केली असता सुरज शिंदे यांनी आपण आपले आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सांगितलं.त्यानंतर शरद पवार यांनी नव वधूवरांना आशीर्वाद देवून शुभेच्छा दिल्या.

नवदाम्पत्याला पाहिल्यानंतर शरद पवार यांनी थांबून वधू-वरांना आशीर्वाद दिले. यानंतर ते पुढे मार्गस्थ झाले. शरद पवारांसोबत सोलापूरचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. यावेळी नवरदेव म्हणाला, ‘भारत नानांची आठवण येते, पण त्यांचे वस्ताद शरद पवारांनी आशीर्वाद दिला याचा आनंद आहे”.