
सोलापूर : मागील काही दिवसांपासून तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणि आतापर्यंत तीन जणांचे प्राण घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. शार्प शूटर धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने या बिबट्याचा वेध घेतला.
या बिबट्ला पकडण्यासाठी फक्त तालुका आणि जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील यंत्रणा कामाला लागली होती. अशा या नरभक्षक बिबट्याला शुक्रवारी वांगी नंबर 4 येथे राखूनडे वस्ती येथे ठार मारण्यात वन विभागाला यश आले.
तालुक्यात अजून किती बिबटे आहेत? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. मात्र सध्या तरी नरभक्षक बिबट्याला ठार केल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे.