Chief Minister Uddhav Thackeray LIVE

माझं गाव कोरोना मुक्त गाव संकल्पनेची राज्यात होणार अंमलबजावणी

  शेखर गोतसुर्वे, नवराष्ट्र : माझं गाव कोरोनामुक्त गाव सोलापूर जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांची संकल्पना उदयास आली असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही संकल्पना राज्याभरात अंमलबजावणी करण्याची रविवारी जनतेशी संवाद साधताना घोषणा केली आहे.

  दिलीप स्वामी, सीईओ ,सोलापूर जिल्हा परिषद

  सीईओ स्वामी यांच्या मुळ संकल्पना व मार्गदर्शनातून गेल्या नोव्हेंबर पासून सोलापूर जिल्ह्यात गावागावात राबविल्या जात असलेल्या माझे गाव कोरानामुक्त गाव या अभियानाची दखल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे. या अभियानात सोलापूर जिल्ह्यातील घाटणे ता.मोहोळ या गावात सरपंच ऋतुराज देशमुख व अंत्रोळी ता.दक्षिण सोलापूर या गावात ग्रामपंचायतीच्या सरपंच कोमलताई करपे यांनी अतिशय प्रभावीपणे राबविल्यामुळे आणि गाव कोरोनामुक्त केल्यामुळे या दोन गावांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला आहे.त्यामुळे राज्यात आपले घर , गाव , तालुका व जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांनी हे अभियान राज्यभर सुरू करण्याचे जाहीर केले आहे

  मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून गाव पातळीवर कोरोना प्रतिबंधाचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सीईओ स्वामी यांनी पदभार घेतल्यानंतर “माझे गाव कोरोना मुक्त गाव” हे अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत कोरोना प्रतिबंधासाठी पंचसूत्री कार्यक्रम आखण्यात आला यामध्ये गावकऱ्यांना कोरोना मुक्तीची शपथ, संपर्क व्यक्तींचा शोध, सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे व हाताची स्वच्छता अशी पंचसूत्री देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी “माझे दुकान माझी जबाबदारी” या अभियानाची सुरुवात करण्यात आली. कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून एवढे प्रयत्न होत असताना नागरिकांकडून मात्र याला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नव्हता. तसेच ग्रामपंचायतींकडूनही जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केलेल्या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे व अभियानास यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

  या सर्व पार्श्वभूमीवर सीईओ स्वामी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांमार्फत गाव भेटीचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील 1-2 गावे निवडून त्या ठिकाणी भेटी द्याव्यात. ज्या अधिकाऱ्यांना तालुके नेमून दिलेले नाहीत अशा अधिकाऱ्यांना प्रशासन विभागाकडून स्वतंत्र आदेश काढण्यात येत आहेत. पंचायत समिती स्तरावर पर्यवेक्षकांपासून सर्व अधिकाऱ्यांचे आदेश काढण्यात येणार आहेत.

  या गाव भेटी कार्यक्रम देण्यात आला.
  १) मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे व हात धुणे या त्रिसूत्रीचा प्रभावी अंमल होतो किंवा नाही हे पाहणे.

  २) कोरोना नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीने काय उपाय योजना केल्या याचा आढावा घेणे.

  ३) सर्व दुकानदार भाजी विक्रेते फळ विक्रेते दूधवाले यांच्या कोरणा चाचण्या झाल्या आहेत काय हे पाहणे.

  ४) प्रत्येक दुकानदारांपर्यंत माझे दुकान माझी जबाबदारी या अभियानाची दशसुत्री पोचली आहे काय ते पाहणे.

  ५) गावात मास्क शिवाय प्रवेश नाही चे फलक व त्याची अंमलबजावणी होते आहे काय हे पाहणे.
  ६) विना मास्कची दंडात्मक कारवाई किती लोकांवर झाली याचा आढावा घेणे.

  ७) जनजागृतीचे कोणते कार्यक्रम हाती घेतले याचा आढावा घेणे.

  ८) पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध व त्यांची संख्या याबाबत आढावा घेणे.

  ९) ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरण व स्वच्छता आदींची घेण्यात येणारी काळजी याबाबत आढावा घेणे.
  १०) गाव भेटीत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठका प्रभात फेरी व राबवलेले इतर कार्यक्रम याबाबत तातडीने माहिती द्यायची आहे.आशी मोहीम सीईओ स्वामी यांनी गावा गावात राबविली..