मोबाईल चोरीचा गुन्हा ५ तासात उघड; ४ आरोपी जेरबंद

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणावेत असे आदेश सदर बझार पोलीस ठाण्यास देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा अनुषंगाने तपास करून मोबाईल चोरीच्या गुन्हा ५ तासाच्या आत उघड करून चोरी करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण दहा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

    सोलापूर : सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणावेत असे आदेश सदर बझार पोलीस ठाण्यास देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा अनुषंगाने तपास करून मोबाईल चोरीच्या गुन्हा ५ तासाच्या आत उघड करून चोरी करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण दहा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

    सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंके, पोलीस हेडकॉन्स्टेबल नदाफ, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस नाईक आवारे, पोलीस नाईक सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल बडूरे, पोलीस कॉन्स्टेबल उगले, पोलीस कॉन्स्टेबल काळजे, पोलीस कॉन्स्टेबल भिंगारे, पोलीस कॉन्स्टेबल गुजरे यांनी पार पाडले आहे.