भीमेच्या पात्रात सहाजणांचा बुडून मृत्यू  ; पंढरपूरजवळ दोन तर लवंगीत चारजण बुडाले

चिंचोली भोसे येथील नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पायल लोंढे व तिच्या सोबत असणारा बारा वर्षीय मुलगा अक्षय हे दोघेजण पाय घसरल्याने नदीच्या पात्रात वाहून गेले. यातील अक्षय याचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात काल सापडला. तर द.सोलापूर मधील लवंगी येथे शिवाजी तानवडे हे भीमा नदीत पोहण्यासाठी गेले असता, त्यांच्या सोबत आलेल्या समिक्षा, अर्पिता, विठ्ठल व आरती या चौघांनी पाण्यात आंघोळीसाठी जाण्याचा प्रयत्न केला.

    पंढरपूर : शहरानजीक असणाऱ्या चिंचोली भोसे येथील पायल सुग्रीव लोंढे व तिच्या सोबत असणारा बारा वर्षाचा भाचा अक्षय हे दोघे जण चंद्रभागेच्या पात्रात वाहून गेल्याची घटना दि.२८ रोजी घडली तर द. सोलापूर भागातील लवंगी येथील तानवडे कुटुंबातील चार बालकांचा दि. २९ रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

    याबाबत समजलेल्या माहितीनुसार, चिंचोली भोसे येथील नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पायल लोंढे व तिच्या सोबत असणारा बारा वर्षीय मुलगा अक्षय हे दोघेजण पाय घसरल्याने नदीच्या पात्रात वाहून गेले. यातील अक्षय याचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात काल सापडला. तर द.सोलापूर मधील लवंगी येथे शिवाजी तानवडे हे भीमा नदीत पोहण्यासाठी गेले असता, त्यांच्या सोबत आलेल्या समिक्षा, अर्पिता, विठ्ठल व आरती या चौघांनी पाण्यात आंघोळीसाठी जाण्याचा प्रयत्न केला. तानवडे यांनी या चौघांना परत पाठवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यानेचौघेही पाण्यात बुडाले. यातील समिक्षा व आरती हे दोघे हाती लागले. इतर दोघांना वाचवताना पुन्हा समिक्षा व आरती पाण्यात बुडाले. तानवडे यांना तोवर दम लागल्याने इतर मदत मिळेपर्यंत चौघांचा मृत्यू झाला. गावातील लोकांना ही घटना घडल्याचे समजल्यानंतर अनेक गावकरी मृतदेह शोधण्यासाठी, मदतकार्य करण्यासाठी धावून आले. या घटनेनंतर लवंगीमध्ये शोककळा पसरली आहे.