टक्केवारींचा पुरावा दया ,कारवाई करतो ; जि.प.अध्यक्ष कांबळे यांचे सदस्यांना आवाहन 

एक कुटुंब आहे व मी त्या कुटुंबाचा प्रमुख आहे मिळालेल्या निधीतून सर्वांची गरज एकाच वेळेस पूर्ण करता येत नसते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी साहेब यांना निधी वाटपाचे पारदर्शक पद्धतीने करण्याचे सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व विभाग प्रमुखांना तशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आहेत आवटे प्रमाणेच अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी मला सहकार्य केले आहे

    सोलापूर : जिल्हा परिषदेत लाचेची टक्केवारी घेऊन अधिकारी कामकाज करित असल्याची तक्रारी प्राप्त होत आहेत. टक्केवारींचा पूरावा दया कारवाई करतो असे आवाहन अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे केले आहे.

    माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत असून त्यानी दिलेल्या आदेशानुसारच व सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी सुचवलेल्या कामानुसार जिल्ह्याचे व करमाळा विकास गटाचे काम चालू आहे ते सांगतील तीच कामे आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळणारा निधी त्यांनी सुचविलेल्या कामासाठी निधीच्या उपलब्धतेनुसार करण्यात येतो जिल्हा परिषदेकडे सध्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध विभागाकडे निधी प्राप्त आहे. त्याचे नियोजन नारायण पाटील व सर्व जिल्हा परिषद सदस्य यांनी सुचविलेल्या कामातूनच करणेत आले आहे आचार संहिता संपल्यानंतर सर्व विभागातील विकास कामाच्या निधी च्या प्रशासकीय मान्यता पहायला मिळतील. मागील आर्थिक वर्षांमध्ये कोरोना मुळे कोणालाही आवश्यक निधी मिळालेला नाही हे सर्वांनाच माहीत आहे याबाबत सदस्या लक्ष्मी आवटे यांनी अभ्यास पुर्ण माहिती न घेता टक्केवारींचा आरोप केला आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मतदार संघातील कोणत्या कायदेशीर कामासाठी बांधकाम विभागात कोणाला किती टक्केवारी दिली हे पुराव्यासह सांगावे आवटे एकीकडे म्हणतात, मी बांधकाम विभागात टक्केवारी दिली व दुसरीकडे परत म्हणतात माझा मतदार संघामध्ये एक हि काम झालं नाही तर मग टक्केवारी दिली कुणाला? असो त्याबाबत संबधित अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून योग्य कारवाई करता येईल
    जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने पूर्ण जिल्ह्याला मला न्याय द्यावा लागत आहे जिल्हा परिषद म्हणजे एक कुटुंब आहे व मी त्या कुटुंबाचा प्रमुख आहे मिळालेल्या निधीतून सर्वांची गरज एकाच वेळेस पूर्ण करता येत नसते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी साहेब यांना निधी वाटपाचे पारदर्शक पद्धतीने करण्याचे सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व विभाग प्रमुखांना तशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आहेत आवटे प्रमाणेच अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी मला सहकार्य केले आहे. तालुक्यातील कामाला आम्ही अगोदर प्राधान्य देण्याचा प्रयत्न आमचा नेहमी राहील यामध्ये कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. असे अध्यक्ष यांच्या प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे.

    भ्रष्टकारभारामूळे जि.प. बदनाम झाली आहे . माझ्या चाळीसवर्षाच्या कारकीर्दित इतका भ्रष्टाचार पाहीला नाही.

    बळीराम साठे, विरोधी पक्षनेते जि.प.