सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देणार : जयसिंह मोहिते-पाटील

साखर उत्पादनाला दुय्यम स्थान देऊन उपपदार्थ निर्मितीवर भर दिल्यास साखर कारखाने फायद्यात राहतील. यावर्षी सहकार महर्षी साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहीते पाटील यांनी केली.

  अकलूज : साखर उत्पादनाला दुय्यम स्थान देऊन उपपदार्थ निर्मितीवर भर दिल्यास साखर कारखाने फायद्यात राहतील. यावर्षी सहकार महर्षी साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहीते पाटील यांनी केली.

  येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२०२२ चे ६० वा ऊस गळीत हंगामाचा बॉयलर प्रदिपन समारंभ शुक्रवारी (दि.८) सकाळी ९:३० वाजता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व त्यांच्या पत्नी सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाला.

  मोहिते-पाटील पुढे म्हणाले, साखर विक्री करुन पैसे मिळवण्यात दीङ वर्ष जाते. त्यापेक्षा उपपदार्थ बनवल्यास पैसे लगेच मिळतात व व्याजातही बचत होते. कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. आमदार रणजितसिहांनी या सिझनला मोठी मदत केली आहे. सहकार महर्षी प्रमाणेच सदाशिवनगरचा शंकर सहकारी कारखानाही चांगला दर देईल. सकाळी सव्वाआठ वाजतां बॉयलर प्रदिपन समारंभानिमित्त श्रीसत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक भीमराव जगन्नाथ काळे व त्यांच्या पत्नी रत्नप्रभा भीमराव काळे या उभयतांचे हस्ते संपन्न झाली.

  कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये १२.५० लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. सर्व मशिनरीच्या ट्रायल्स पूर्ण झालेल्या असून, प्रतिदिवशी ८,५०० मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्रप्रणाली कार्यान्वित केली आहे. ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंद दिलेला व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी केले.

  तसेच मागील गळीत हंगाम २०२०-२०२१ मध्ये सभासद व बिगर सभासद यांनी गळीतास दिलेल्या ऊसाच्या एफआरपीची अंतिम देय रक्कम प्रति मे. टन १२१ रुपयांप्रमाणे त्याच खात्यावर आजरोजी वर्ग करण्यात येत आहे. तसेच कारखाना कर्मचारी यांनी दीपावली सणापूर्वी ८.३३% बोनस देण्यात येणार उर्वरीत रक्कम संक्रातीला देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी यावेळी सांगितले.

  यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील तसेच संचालक नामदेव ठवरे, लक्ष्मण शिंदे, धनंजय चव्हाण, शंकरराव माने-देशमुख, विजय माने-देशमुख, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे, विश्वास काळकुटे, चांगदेव घोगरे, भारत फुले, तसेच संचालिका माधूरी लोंढे, कमल जोरवर, कामगार संचालक मोहित इनामदार व इतर मान्यवर धनंजय दुपडे, विनायक केचे, अमराव रेडे, अनिलराव कोकाटे, रामचंद्र ठवरे, नामदेव चव्हाण, नितीन निंबाळकर, चंद्रशेखर दुरापे, अमरसिंह माने-देशमुख, रणजित रणनवरे तसेच कारखान्याचे सभासद, खातेप्रमुख, युनियन प्रतिनिधी व कर्मचारी यांचे उपस्थित शासकीय नियमांचे पालन करण्यात येऊन सामाजिक अंतर ठेवून संपन्न झाला.