अध्यक्षांच्या एंट्रीमूळे लेटकमर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले ; प्रवेशद्वारावरचं मारला ठिय्या , वेळेवर येणाऱ्यांचे स्वागत

लेटकमर , हजेरी लावून कामावरून गायब होणाऱ्या विनावेतनाची कारवाई करा असा आदेश अनिरुध्द कांबळे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना फोनद्वारे दिले आहेत. बेशिस्तपणात वावरणाऱ्या कर्मचा-यांना निलंबीत करण्याची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    शेखर गोतसुर्वे , सोलापूर : उशिरा कामावर हजर होणाऱ्या लेटकमर कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. दस्तुरखूद प्रवेशद्वारावरच जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे ठिय्या मांडला , वेळेवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागत ही त्यांनी केले.

    बुधवारी सकाळी ९:३० च्या सुमारास जि.प.अध्यक्ष अनिरूध्द कांबळे हे मुख्यालयात दाखल झाले कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याची बाब त्यांना निर्देशनास आली. प्रवेशद्वारा जवळील बायोमॅट्रीक हजेरीच्या ठिकाणी त्यांनी ठिय्या मांडला. अध्यक्ष यांना हजेरीच्या ठिकाणी प्रत्यक्षात पाहून कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली. बहूतांशी कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात अशी तक्रार सदस्यांकडून वारंवार करण्यात येत होती. या तक्रारीची दखल अध्यक्ष यांनी घेत ठिय्या मांडला आहे. मुख्यालय परिसरात अध्यक्षांची चर्चा होत असताना विभागप्रमूखांची धांदल उडाली , अध्यक्ष कांबळे प्रत्येक विभागीय कार्यालायत जाऊन पाहणी केली. तेथील हजेरी पञक, हालचाल रजिस्टर, फिरती रजिस्टरची तपासणी केली. सीईओ दिलीप स्वामी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते उपचार घेत आहेत, सीईओ हे कार्यालयात नसल्याचा फायदा बहुतांशी कर्मचाऱ्यांनी घेतला उशिरा कामावर हजर होणे, हजेरी लावून कामावरुन गायब होणे, दैनंदिन कामकाजात वेळकाढूपणा करणे आशा बाबी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्या पाहणीनीत निर्देशनास आल्या आहेत.

    अध्यक्षांचा सीईओना विनावेतनाचा आदेश

    लेटकमर , हजेरी लावून कामावरून गायब होणाऱ्या विनावेतनाची कारवाई करा असा आदेश अनिरुध्द कांबळे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना फोनद्वारे दिले आहेत. बेशिस्तपणात वावरणाऱ्या कर्मचा-यांना निलंबीत करण्याची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.