ऊर्जामंत्री नितीन राऊत मागासवर्गीय असल्यामुळेच अडचण; प्रकाश आंबेडकरांनी केलेली  बरामतीकरांवर टीका

लाॅकडाऊन काळात वाढीव वीज युनिटच्या वाढीव दरा बाबत ट्राय कोर्टाकडून सुनावणी होणे अपेक्षित आहे तसा कायदा असता देखील ठाकरे सरकारने वीज बिलाच्या युनिट दरात दुप्पटीने वाढ केली आहे , वीज युनिटचा दरात केलेली वाढ अगोदर सरकारने रद्द करावी - ॲड प्रकाश आंबेडकर

    सोलापूर: कांग्रेस पक्षाचे आणि त्यातल्यात्यात मागासवर्गीय मंत्री असल्यामुळेच वीज बिलाच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्याकडून जाणीवपूर्वक अडचण निर्माण केली जात आहे नाही तर थकीत वीजबिलाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरात व्यक्त केले आहे..

    वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच सोलापूर दौऱ्यावर केला आहे. तेव्हा एका प्रश्नाला उत्तर देताना ॲड प्रकाश आंबेडकर हे बोलत होते. लाॅकडॉन काळातील थकीत वीज बिल शासनाने माफ करावे, अशी मागणी राज्यभरातून होत असताना राज्याच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थकीत वीजबिल माफ करण्याच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव मंत्रीमंडळात सादर केला असता राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे जाणीवपूर्वक ऊर्जामंत्र्यांच्या प्रस्तावाला अडचण निर्माण करत आहेत. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे केवळ मागासवर्गीय मंत्री असल्यामुळेच बारामतीकर हे थकीत वीज बिलालाच्या प्रस्तावाल विरोध करत असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली

    लाॅकडाऊन काळात वाढीव वीज युनिटच्या वाढीव दरा बाबत ट्राय कोर्टाकडून सुनावणी होणे अपेक्षित आहे तसा कायदा असता देखील ठाकरे सरकारने वीज बिलाच्या युनिट दरात दुप्पटीने वाढ केली आहे , वीज युनिटचा दरात केलेली वाढ अगोदर सरकारने रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केली . पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत मतदारांनी थकीत वीज बिलाच्या प्रस्तावाला विरोध करणा-या खोटारड्या मंत्र्याला त्याची जागा दाखवून द्या असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले