railway

कोरोना माहामारीमुळे मागील ६ महिन्यांपासून देशभरातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. यानंतर विशेष रेल्वे कामगरांसाठी सुरु केल्या. आता रेल्वेची परिस्थिती पुर्वपदावर आलेली आहे. सोलापूरच्या नागरिकांसाठी ९ ऑक्टोबरपासून गाडी क्र ०२११५/०२११६ सोलापूर-मुंबई सोलापुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार आहे.

सोलापूर : मुंबई ते सोलापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी (Passanger) खुशखबर मिळाली आहे. सोलापूरची लाईफ लाईन समजली जाणारी गाडी क्रमांक ०२११५/०२११६ सोलापूर -मुंबई सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (Solapur-Mumbai Superfast Special Express)  शुक्रवार ९ ऑक्टोबरपासून धावणार आहे. याबाबतची माहित मिळाली आहे.

कोरोना (Corona) माहामारीमुळे मागील ६ महिन्यांपासून देशभरातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. यानंतर विशेष रेल्वे (Railway) कामगरांसाठी सुरु केल्या. आता रेल्वेची परिस्थिती पुर्वपदावर आलेली आहे. सोलापूरच्या नागरिकांसाठी ९ ऑक्टोबरपासून गाडी क्र ०२११५/०२११६ सोलापूर-मुंबई सोलापुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार आहे.

ही गाडी विशेष एक्सप्रेसच्या वेळेवर धावेल आणि स्थानकावरील हॉल्ट सुद्धा त्याच प्रमाणे असतील, परंतु कर्जत, खंडाळा, लोनावळा, माढा, मोहोळ आणि भिगवण स्थानकावरील ही एक्सप्रेस थांबणार नाही.

संबंधित गाडी क्रमांक ०२११५ छत्रपती शिवाजी माहाराज टर्मिनल ते सोलापुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस ९ ऑक्टोबरपासून सीएसएमटी (मुंबई) स्थानकावरुन धावणार आहे. तसेच सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस ९ ऑक्टोबरपासून सोलापूर स्थानकावरुन धावणार आहे.