मंगळवेढा शहरातील पेट्रोल पंपावरून चोरट्याने दुचाकी पळविली

गेल्या दाेन वर्षात झालेल्या घरफाेड्यामधील ऐकही चाेरी उघड करण्यात पाेलीसांना यश आले नाही. मागील दिड महिन्यापूर्वी शहराजवळ पडलेला दराेडा हा ही कायम तपासवारच राहीला आहे. परिणामी चाेरांचा शाेध लावण्यात मंगळवेढ्याची पाेलीस यंत्रना कूचकामी आसल्याचा आराेप जनतेकडून हाेत आहे.

    मंगळवेढा: मंगळवेढा शहरातील एस.टी स्टँड समोर असलेल्या पेट्रोल पंपावरून एका कर्मचाऱ्याची २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्याने हातोहात पळवून नेहल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मागील काही दिवसापासून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एकाच आठवड्यात चौथी मोटारसायकल चोरट्याने पळवून नेल्याने मोटारसायकलस्वार धस्तावले आहेत. यातील फिर्यादी निशांत अंकुश रोकडे मंगळवेढा शहरातील खरेदी विक्री संघातील पेट्रोल पंपावर कर्मचारी असून त्यांनी हिरो होंडा स्प्लेडर कंपनीची क्रमांक एम.एच.१०.सी.पी.८९४१ ही २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल रात्री पेट्रोल पंपावर लावली होती.

    सकाळी उठल्यानंतर फिर्यादीने पाहिले असता मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. आज्ञात चाेराने चाेरून नेल्याची खात्री पटल्यावर चाेरीची फिर्याद दाखल झाली आहे.दरम्यान गेल्या दाेन वर्षात झालेल्या घरफाेड्यामधील ऐकही चाेरी उघड करण्यात पाेलीसांना यश आले नाही. मागील दिड महिन्यापूर्वी शहराजवळ पडलेला दराेडा हा ही कायम तपासवारच राहीला आहे. परिणामी चाेरांचा शाेध लावण्यात मंगळवेढ्याची पाेलीस यंत्रना कूचकामी आसल्याचा आराेप जनतेकडून हाेत आहे. मंगळवेढ्याकडे एक पी.आय.तिन ऐ.पी.आय.तीन पी.एस.आय.ऐवढा आधिकारी वर्ग आसताना चाेरीचा तपास कसा काय?लागत नाही आसा आराेप सुज्ञ नागरीक करीत आहे,तपास लागत नसेल तर सक्षम पाेलीस आधिकारी नेमून राज्याचे पाेलीस महासंचालकांनी येथिल वाढत्या चाेऱ्या थांबवाव्यात आशी मागणी आहे.