The trophy came directly from London to Solapur; Welcome by Disley Guruji

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आला होता. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले. मात्र, डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर्स अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावता आली नाही. त्यामुळे, आता डिसले गुरुजींनी मिळवलेली ट्रॉफी त्यांना घरपोच आली आहे. दरम्यान, डिसले यांची ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी वर नेमणूक करण्यात आली आहे.

    मुंबई : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आला होता. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले. मात्र, डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर्स अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावता आली नाही. त्यामुळे, आता डिसले गुरुजींनी मिळवलेली ट्रॉफी त्यांना घरपोच आली आहे. दरम्यान, डिसले यांची ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी वर नेमणूक करण्यात आली आहे.

    विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता असते. आपण त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिले आणि त्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून दिले, तर ते जग पादाक्रांत करू शकतील. त्यांच्या कथांवर झोत टाकण्यासाठी आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी जागतिक विद्यार्थी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

    या समितीवर निवड झाल्याचा मला अभिमान असून अशा प्रेरणादायक उद्देशाला माझा पाठिंबा आहे. प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा दिशेने एक पाऊल असल्याची अशी प्रतिक्रिया ग्लोबल टीचर पुरस्काराचे मानकरी रणजितसिंह डिसले यांनी या निवडीनंतर दिली आहे.