पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणखी एक दिवस राहणार बंद

वर्षातील चार यात्रा पैकी प्रमुख एक माघ शुद्ध एकादशी पासून पाच दिवस माघी यात्रा सोहळा पंढरपूर मध्ये साजरा केला जातो. मात्र कोरोनाचा नवीन स्ट्रेस लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, हा सोहळा प्रतिकात्मक रूपाने साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी माघी यात्रेसाठी चार ते पाच लाख भाविक दरवर्षी पंढरीत दाखल होतात. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भाविकांची गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार वाढेल, ही बाब टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने दि. २४ रोजी पूर्ण दिवस मंदिर बंद ठेवण्याची ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    पंढरपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, विठ्ठल मंदिर समितीने मंदिरबंदीची मुदत आणखी एक दिवस वाढवली असून उद्या दिनांक २४ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

    वर्षातील चार यात्रा पैकी प्रमुख एक माघ शुद्ध एकादशी पासून पाच दिवस माघी यात्रा सोहळा पंढरपूर मध्ये साजरा केला जातो. मात्र कोरोनाचा नवीन स्ट्रेस लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, हा सोहळा प्रतिकात्मक रूपाने साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी माघी यात्रेसाठी चार ते पाच लाख भाविक दरवर्षी पंढरीत दाखल होतात. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भाविकांची गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार वाढेल, ही बाब टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने दि. २४ रोजी पूर्ण दिवस मंदिर बंद ठेवण्याची ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, पंढरपूर नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, श्रीमती शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरु, माधवी निगडे यांच्या बैठकीत घेण्यात आला असून याबाबतचे परिपत्रक त्यांनी जाहीर केले आहे.