…तर सीईओ कार्यालयाला ठोकणार टाळे; शैला गोडसे यांचा इशारा

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ तालुक्यातील कुरुल इचगाव येथील कामे प्रशासनाच्या उदासिनतेमुळे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे सीईओ कार्यालयाला कुलूप ठोकणार असल्याचे जि.प.सदस्या शैला गोडसे यांनी इशारा दिला आहे.

    गुरुवारी सदस्या शैला गोडसे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्याच्या तयारीत आल्या होत्या. डेप्यूटी सीईओ चंचल पाटील यांनी मध्यस्थीची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागणी जोर धरत असताना सीईओ दिलीप स्वामी यांनी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्या निजी कक्षात शैला गोडसे यांना बोलावून सर्व माहिती जाणून घेतली. कुरुल येथील प्राथमिक उपकेंद्राचे निकॄष्ठ बांधकाम आणि इचगाव येथील स्माशनभूमी निधी संदर्भात प्रशासन उदासीन कारभारावरून शैला गोडसे यांनी आगपाखड केली.

    दरम्यान, या सर्व पाशर्वभूमीवर सीईओ आणि अध्यक्ष यांनी एक महिन्यात मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने शैला गोडसे यांनी गुरुवारचे आंदोलन स्थगित करुन महिन्यात काम पूर्ण न झाल्यास सीईओ कार्यालयाला कुलूप ठोकणार असल्याची माहिती शैला गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंदोलनात अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त जि.प.मुख्यालयात तैनात करण्यात आला होता.