मराठा आक्रोश मोर्चाचा चोरट्याने ‘असा’ घेतला फायदा; एक लाखाची सोन्याची चैन लंपास

    सोलापूर : अज्ञात चोरट्याने मराठा आक्रोश मोर्चा असल्याने त्या गर्दीचा फायदा घेऊन 1 लाख 10 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना ४ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संभाजी महाराज चौक सोलापूर येथे घडली. याप्रकरणी सुरेश भानुदास अंबुरे (वय-५०,रा. मु.पो. बार्डी तालुका पंढरपूर,जिल्हा सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुरेश अंबुरे यांचा मुलगा सौरभ व त्याचा मित्र असे दोघे मिळून खाजगी वाहनाने शेताचे साहित्य खरेदी करण्यासाठी सोलापूरला आले होते. त्यावेळी संभाजी महाराज चौक सोलापूर येथे मराठी आक्रोश मोर्चा असल्याने लोकांची गर्दी झाली होती. त्यावेळी त्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक राठोड हे करीत आहेत.