कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पायी वारी सोहळा रद्द , आज तुकोबांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी प्रस्थान

वारीच्या वाटेवर होणारी कीर्तन, जागर कार्यक्रम देऊळवाडय़ातच होणार आहेत. तर, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 जुलै रोजी पादुका एसटी बसने श्रीक्षेत्र पंढरपूरला रवाना होतील. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आल्याने प्रस्थान झाल्यानंतर चलपादुका 1 जुलै ते 18 जुलै या कालावधीत देहूतील मुख्य मंदिरात राहणार आहेत.

    कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा शंभर वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असला तरी परंपरेनुसार होणाऱ्या सोहळ्याची जय्यत तयारी संत तुकाराम महाराज संस्थानने केली आहे. यंदा प्रस्थान झाल्यानंतर पादुका देऊळवाडय़ातच ठेवण्यात येणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 336 व्या पालखी सोहळ्य़ासाठी चलपादुकांचे गुरुवारी आषाढी वारीसाठी परंपरेनुसार विधिवत प्रस्थान होणार आहे.

    वारीच्या वाटेवर होणारी कीर्तन, जागर कार्यक्रम देऊळवाडय़ातच होणार आहेत. तर, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 जुलै रोजी पादुका एसटी बसने श्रीक्षेत्र पंढरपूरला रवाना होतील. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आल्याने प्रस्थान झाल्यानंतर चलपादुका 1 जुलै ते 18 जुलै या कालावधीत देहूतील मुख्य मंदिरात राहणार आहेत.

    या कालावधीत देऊळवाडय़ात मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. 18 जुलैपर्यंत वारीच्या वाटेवर दररोज पंरपरेनुसार होणारे धार्मिक कार्यक्रम साध्या पध्दतीने देऊळवाडय़ात होणार आहेत. त्यासाठी प्रवचनकार, कीर्तनकार, पालखीचे मानकरी, सेवेकरी, टाळकरी, मचलेकर दिंडीवाले यांना निमंत्रित करण्यात आले आहे.