प्रवेशद्वारावर वाद घालणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल ; जि.प. प्रशासनाला सीईओंचे आदेश

-दिलीप स्वामी यांचे युनियनच्यावतीने स्वागत

    सोलापूर : जि.प. मुख्यालय प्रवेशद्वारावर वाद घालणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी प्रशासनाला दिले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास सीईओ दिलीप स्वामी कोरोना उपचारा नंतर मुख्यालयात दाखल झाले. कोरोना प्रतिबंध उपाययोजनेच्या बैठकीसाठी आले होते. जि.प.कर्मचारी युनियनच्या वतीने फूलांची उधळण करुन सीईओ स्वामी यांचे स्वागत करण्यात आले.

    प्रवेशद्वारावरची गर्दी पाहून सीईओ स्वामी यांनी उपस्थितीना खडेबोल सुनावले . अतिमहत्वाचे काम असेल तरचं मुख्यालयात कोरोना तपासणी करून यावेत,ऑनलाईन द्वारे कामकाजाची विचारणा करावी, प्रवेशद्वारावर वाद घालणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    प्रवेशद्वारा समोरील आरोग्य पथकाची पाहणी केली. दुपार पर्यंत तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांमधून एक ही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.