जबरी चोरी करणारे तीन आरोपी अटकेत; दोन दुचाकींसह 10 मोबाईल जप्त

जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती.

    सोलापूर : जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करून दोन मोटरसायकलींसह 10 मोबाईल असा 1 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात जोडभावी पेठ पोलिस स्टेटनच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने तपास करत असता हैदराबाद रोड मार्केटयार्ड येथे संशयास्पदरित्या दोन तरुण आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या अनुषंगाने या तरुणांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी विविध मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची माहिती दिली.

    मुळेगाव तांडा येथील समीर फारूक इनामदार, विशाल छबु गाडे, अभिषेक मोतीराम राठोड, या तीन संशयित तरुणांना अटक करून दोन मोटारसायकलींसह 10 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.

    ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त माधव पडिले-रेड्डी, जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचित, पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाइंगडे, पोलीस हवालदार आर एन थोरात, नंदकुमार गायकवाड, पोलीस नाईक सुरेश जमादार, योगेश बरडे, बापू साठे, आय्याज बागलकोठे, प्रकाश गायकवाड, अतुल गवळी, पोलीस शिपाई सैपण सय्यद, अविनाश राठोड, अभिजित पवार, गोपाळ शेळके, निलेश घोगरे, सुहास गायकवाड, यशसिह नागटिळक आदींनी पार पाडली.