लवंगीत भीमा नदीपात्रात पोहायला गेलेल्या तीन मुली व एक मुलगा बेपत्ता ; बेपत्ता चारही मुलांचे मृतदेह सापडले

अर्पिता शिवाजी तानवडे (वय १३), समिक्षा शिवाजी तानवडे (वय १४), आरती शिवानंद पारशेट्टी (वय १३) व विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय १०) असे नदीत पोहायला गेलेल्या दुर्देवी मुलांची नावे आहेत. गत शनिवारी दुपारी भीमा नदीत उजनी धरणातून सोडलेले पाणी आल्याने दुपारी कडक ऊन असल्याने पोहण्यासाठी अर्पिता व समिक्षा या दोघी वडील शिवाजी तानवडे यांच्या सोबत गेल्या. यावेळी त्यांच्या सोबत मामाची मुलगी आरती व मुलगा विठ्ठल पारशेट्टी हेही पोहण्यासाठी भीमा नदी पात्रात गेले.

  भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीपात्रात पोहायला गेलेली तीन मुली व एक मुलगा असे चारजण बेपत्ता गेले. बेपत्ता मुलांचे शोध कार्य सुरू असतानाच सायंकाळी पाऊस आला. ही घटना गत शनिवार २९ मे रोजी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यानच्या घडली. बेपत्ता झालेल्या दुर्दैवी चारही मुलांचे मृत्तदेह आज रविवार ३० मे रोजी सापडले.

  याबाबतची माहिती अशी की, अर्पिता शिवाजी तानवडे (वय १३), समिक्षा शिवाजी तानवडे (वय १४), आरती शिवानंद पारशेट्टी (वय १३) व विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय १०) असे नदीत पोहायला गेलेल्या दुर्देवी मुलांची नावे आहेत. गत शनिवारी दुपारी भीमा नदीत उजनी धरणातून सोडलेले पाणी आल्याने दुपारी कडक ऊन असल्याने पोहण्यासाठी अर्पिता व समिक्षा या दोघी वडील शिवाजी तानवडे यांच्या सोबत गेल्या. यावेळी त्यांच्या सोबत मामाची मुलगी आरती व मुलगा विठ्ठल पारशेट्टी हेही पोहण्यासाठी भीमा नदी पात्रात गेले. पाणी कमी असल्याने दररोज थोड्या पाण्यात ही मुले दररोज पोहायला जात होते. मात्र भीमा नदी उजनी तून सोडलेले पाणी सादेपूर बंधारा ओलांडून लवंगी मार्गे औजच्या दिशेने पुढे वेगाने सरकत आहे. येथे दुथडी भरून नदीपात्र वाहत आहे. यामुळे पाण्यात उतरलेल्या या चारही मुलांना पाण्याचा खोलीचा अंदाजच आला नाही. नदीत पोहायला जाताच ते जास्त पाणी असल्याने बुडू लागले. तिथे जवळच असलेले त्यांचे वडील शिवाजी यांनी अप्पू पारशेट्टी यांना हाक मारून सांगितले. वडील शिवाजी यांनी बुडणाऱ्या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शिवाजी हे स्वतःही बुडू लागले. त्यांच्या हातात सापडलेल्या दोन्ही मुली देखील वाहून गेल्या. बुडणारे शिवाजी यांना अप्पू पारशेट्टी यांनी वाचवले.

  या घटनेची माहिती मिळताच मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान लवंगी गावातील तीस-चाळीस तरुणांनी नदीपात्रात उड्या टाकून वाहून गेलेल्या मुलांना शोधू लागले. मात्र त्यांना त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर टाकळी व सादेपूर येथील भोई समाजातील मच्छिमारांना बोलावण्यात आले. दरम्यान सायंकाळी जोरदार पाऊस पडू लागल्याने शोधकार्यात व्यत्यय ते थांबवण्यात आले.सहायक पोलीस निरीक्षक डॉ. थेटे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, गावचे सरपंच सरपंच संगमेश बगले – पाटील, पोलीस पाटील कुमार बगले, भाजपचे सरचिटणीस यतीन शहा व हणमंत कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी थांबून होते. मृत्तदेह सापडताच मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

  समिक्षा व आरतीचा मृत्तदेह मिठी मारलेल्या अवस्थेत

  दरम्यान आज रविवर ३० मे सकाळी सातच्या दरम्यान आर्पिताचा तर दुपारी बाराच्या दरम्यान समिक्षा व आरतीचा मृत्तदेह मिठी मारलेल्या अवस्थेत मिळून आले. तर वीस तासांनी शेवटचा विठ्ठलचा मृत्तदेह सापडला. बहीण भावाचीच चार मुले एकाच वेळी नदीत बुडून मृत्यू पावले. या घटनेने लवंगी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  दक्षिण सोलापूरच्या भीमा नदीकाठावरील कोणत्याही गावात कोणीही नदीत पडले. तर भंडारकवठे, सादेपर टाकळी येथील भोई समाजातील मच्छिमार बोलावले जाते. अलिकडे सादेपूर, भंडारकवठे येथील बंधाऱ्यानंतर लवंगीतील घटना आहे. मात्र शासनाकडून भोई समाजाला विमा संरक्षण मिळावी असा ठराव करणार

  संगमेश बगले - पाटील, सरपंच लवंगी