लसीकरणाचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘या’ वस्तू असणार बंधनकारक, पहिल्या टप्प्यात कोरोना लस कोणाला दिली जाणार?

कोरोनावरील लस (Corona Vaccine)  आता अंतिम टप्प्यात आली असून जानेवरी २०२१ मध्ये पहिल्याच टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना (medical staff) दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे लसीचा काळाबाजार होऊ नये म्हणून संबंधितांकडे आधार (Aadhar Card) तथा पॅनकार्ड (Pan card) असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सोलापूर : देशात कोरोना विषाणूचा( Corona Virus) प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. परंतु काही राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. तसेच कोरोनावरील लस (Corona Vaccine)  आता अंतिम टप्प्यात आली असून जानेवरी २०२१ मध्ये पहिल्याच टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना (medical staff) दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे लसीचा काळाबाजार होऊ नये म्हणून संबंधितांकडे आधार (Aadhar Card) तथा पॅनकार्ड (Pan card) असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रत्येक शंभर व्यक्तींमागे एक बुथ तयार केला जाणार आहे. त्याठिकाणी एक पोलीस कर्मचारी आणि एका शिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यातील जिल्ह्यानिहाय वैद्यकीय कर्मचाऱ्यांची माहिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मागवून घेतली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सव्वा कोटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींना अंतिम टप्प्यात को-मॉर्बिड रूग्णांना लस दिली जाणार आहे. चार प्रकारच्या लसी तयार करण्यात आल्या असून त्यापैकी राज्यात तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे दिली जाणारी लस मिळणार असल्याची शक्यता सार्वजिनक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश असून ऑनलाइन पोर्टलवरील नावांची खातरजमा करण्याची मुख्य जबाबदारी शिक्षकांवरच सोपवली जाणार आहे.