अकलूज उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार; विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध संस्थांच्या वतीने ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत.

    अकलूज : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध संस्थांच्या वतीने ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत. याच धर्तीवर अकलूज उपजिल्हा रुग्णालयात ही ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असून, आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते जागेचे भूमिपूजन करण्यात आले.

    जिल्हाधिकारी मिंलीद शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदिप ढेले यांच्या विशेष सहकार्याने सदरच्या प्लांटची उभारणी करण्यात येत असून हा ऑक्सिजन प्लान्ट 600 L P M MEDICAL OXYGEN PLANT या श्रेणीतील असणार आहे. या प्लान्टचा खर्च अंदाजे ६० ते ७० लाख रुपये असून, हा सर्व खर्च HONEY WELL कंपनी, पुणे (बेंगलोर, मुंबई, वडोदरा, चेंनई, कोलकाता, अमेरिका इत्यादी) यांचेमार्फत करण्यात येणार आहे. या ऑक्सिजन प्लांट 31 दिवसात कार्यान्वित होणार आहे असून रूग्णसेवेसाठी उपजिल्हा रुग्णालय अकलूज या रूग्णालयास मोफत हस्तांतरित होणार आहे.

    कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ.मुकुंद जामदार, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. मनीषा कदम, डॉ.निखिल मिसाळ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्लान्टमुळे कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजन उपलब्धेचा मोठा प्रश्न मिटणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.