सोलापूर जिल्हा परीट सेवा मंडळ युवक संघटनेच्या वतीने वृक्षारोपण

    टेंभुर्णी : रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत गाडगे महाराज या थोर महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी जोपासत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर, टेंभुर्णी येथे सोलापूर जिल्हा परीट (धोबी) सेवा मंडळ युवक संघटनेच्या वतीने युवक जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ननवरे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले.

    प्रथम महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस सरपंच प्रमोद कुटे व भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी  जयवंत पोळ (रि.पा.इं जिल्हा अध्यक्ष), मधुकर (अण्णा) देशमुख (शिवसेना माढा ता. प्रमुख), धनंजय गोंदील (उपसरपंच टेंभुर्णी),  परमेश्वर खरात गोरख(बप्पा) देशमुख (संभाजी ब्रिगेड), दयानंद पवार (राज्य संघटक शा.नि.शा.सं.), राजेंद्र सरफळे (उद्योजक)  ॲड.समीर तांबोळी, गणेश पाटील (तंटामुक्ती अध्यक्ष), गणेश केचे, शैलेश ओहोळ, डॉ.सोमनाथ साळुंखे, अमोल धोत्रे (ग्रा.पं.सदस्य,टेंभुर्णी), श्रीकांत लोंढे (जेष्ठ मार्गदर्शक), संजय लोंढे (जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर जि.प.से.मं.) आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण  करण्यात आले.

    यावेळी राहुल टिपाले (उद्योजक), जहांगीर तांबोळी (जिल्हा उपाध्यक्ष अ.सं.सेल), सतीश चांदगुडे (संभाजी ब्रिगेड), प्रशांत देशमुख, बाळासाहेब बारवे, लखन माने (टायगर ग्रुप), पोपट कारंडे, गुरुदेव लोंढे, विनोद लोंढे, सौरभ राऊत, पांडुरंग खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

    या कार्यक्रमास माणिक (अण्णा) खरात, संतोष खरात, महावीर लोंढे, अमोल खरात, दिनेश खरात,  नवनाथ खरात, शिवम बोडके आदींनी परीश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवरांचे संयोजक राजाभाऊ ननवरे यांनी आभार मानले.