मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने कामतीसह परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

    अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस रमेश चौगुले, राज्य उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली कामती पोलीस स्टेशन, इंदिरानगर (कामती) येथील जि.प. शाळा, कोरवली ग्रामपंचायत परिसर व स्मशानभूमी, नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल सोलापूर, योगेश्वर विद्यालय हिरज आदी ठिकाणी विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

    याप्रसंगी शिक्षक सेनेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष प्रसाद मसरे, शहराध्यक्ष काशिनाथ माळगोंडे, प्रा. कडलासकर, अंबादास चव्हाण, महिला अध्यक्ष ज्ञानेश्वरी संगीतराव, संजय दसाडे, संजीवकुमार कलशेट्टी, चंद्रकांत साळुंखे, हरून मुलाणी, कपिल क्षीरसागर, किरण माळी, उपसरपंच दीपक काटकर, आनंद पाटील, शाखाध्यक्ष विष्णू कदम, महादेव जन्मले, संभाजी गावडे, हिरजचे अनिल माने, अनिता वसेकर, कोरवलीचे माजी सरपंच सुरेश म्हमाणे, दयानंद पाटील, उपसरपंच बाळू कस्तुरे, सिद्धाराम म्हमाणे, दयानंद तारके, महासिद्ध वाले, अमोल गेंगाणे, साधू पाटील, संजय कस्तुरे, अमोगसिद्ध तारके, शिवानंद म्हमाणे, भारत कोरे यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

    कोरवली येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिक्षक सेनेच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीपणे होणेसाठी शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.