उजनीचा “तो” आदेश अखेर रद्द

करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी या प्रश्नी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता गुरुवारी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती आमदार संजय शिंदे हे मुंबईत होते त्यांनी अखेर पाच टीएमसी पाणी न देण्याचे शासनाचे ते पत्र आपल्याकडे घेतलेच.

    सोलापूर : इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा आदेश अखेर महाराष्ट्र सरकारनी रद्द केला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाला यश आले.सोलापूरच्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी पाच टीएमसी पाणी द्यायला मंजुरी मिळाली होती मात्र या विरोधात सोलापूरकरांनी रान उठवले, सर्व पक्षांनी विरोध दर्शवला. शेवटी शासनाने इंदापूरला पाच टीएमसी पाणी द्यायचे नाही अशा आदेशाचे पत्र अखेर काढले.

    करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी या प्रश्नी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता गुरुवारी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती आमदार संजय शिंदे हे मुंबईत होते त्यांनी अखेर पाच टीएमसी पाणी न देण्याचे शासनाचे ते पत्र आपल्याकडे घेतलेच. यावेळी आमदार संजय शिंदे यांच्यासोबत माजी खासदार धनंजय महाडिक पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांची उपस्थिती होती. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांच्या सहीचे पत्र निघाले आहे.