वडोलीच्या सरपंचपदी स्वाती चव्हाण यांची बिनविरोध निवड

    टेंभुर्णी : माढा तालुक्यातील वडोली येथे घेण्यात आलेल्या सरपंच निवड प्रक्रियेत स्वाती अतुल चव्हाण यांची निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी शबाना कोरबू यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. वडोली गावची २०१८ साली झालेल्या निवणुकीत सात ग्रामपंचायत सदस्य व अर्चना आप्पासाहेब बंडगर यांची जनतेतून सरपंच म्हणून निवड झाली होती. त्यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने वडोली गावचे सरपंचपद रिक्त असल्याने प्रशासनाने सरपंच निवड प्रक्रिया १३ जुलै मंगळवार रोजी जाहीर केली होती. यावेळी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या वेळेत सरपंच पदासाठी स्वाती चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

    यावेळी सात सदस्यांपैकी नूतन सरपंच स्वाती चव्हाण, तानाजी गाडे-पाटील, उपसरपंच स्वाती बिटू सुरवसे, सुप्रिया शिवाजी जाधव, सुभाष जगन्नाथ लोकरे व स्वाती गणेश खडतरे हे सहा सदस्य उपस्थित होते.

    या निवडणूक प्रक्रियेत ग्रामसेवक नारायण सोनवणे यांनी प्रोसिडिंग लिहिले तर तलाठी दादाराम गुटाळ, पोलीस पाटील धनाजी काळे-पाटील, कोतवाल सुदर्शन गुरव, विकी मोरे, धनाजी बागाव यांनी मदत केली.

    यावेळी माजी सरपंच प्रतिनिधी आप्पासाहेब बंडगर, नूतन सरपंच प्रतिनिधी अतुल चव्हाण, मातंग जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बागाव, संजय कांबळे, गोरख भाग्यवंत, सुखदेव मोरे, अमोल चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड प्रक्रियेनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची मुक्त उधळण केली.