आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपा चिन्हाचा! दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा : आमदार सचिन कल्याणशेट्टी

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले,  जिल्हा परिषद निधी वाटपा संदर्भात अनियमिता झाल्याची तक्रार ग्रामविकासमंत्री यांच्याकडे केली होती.त्या अनुषंगाने ग्रामविकासमंत्री यांनी स्थगिती दिली होती. या स्थगितीवर अनियमता करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत करून कारवाई का करण्यात आली नाही.

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात भाजपमय वातावरण आहे. आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपा चिन्हाचाचं असेल आशी माहीती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.आ.कल्याणशेट्टी हे जिल्हा परिषदेत आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी जिल्हा परिषद , पंचायात समित्या, नगरपरिषदा , निवडणूकांमध्ये भाजपाचा प्रभाव दिसून येईल प्रत्येक गावा गावात भाजपमय वातावरण निर्माण झाल्याचे म्हणाले.

    पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले,  जिल्हा परिषद निधी वाटपा संदर्भात अनियमिता झाल्याची तक्रार ग्रामविकासमंत्री यांच्याकडे केली होती.त्या अनुषंगाने ग्रामविकासमंत्री यांनी स्थगिती दिली होती. या स्थगितीवर अनियमता करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत करून कारवाई का करण्यात आली नाही. यासंदर्भातील माहीती घेण्यासाठी सीईओ यांच्याशी भेट घेणार होतो मात्र सीईओ दिलीप स्वामी,अॅडी.सीईओ संतोष धोत्रे , डेप्यूटी सीईओ चंचल पाटील यांची पक्षनेता कार्यालयात भेट झाली. सीईओ आणि विभाग प्रमूख यांची अध्यक्ष समवेत प्रशासकीय बैठक असल्याने सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. आगामी निवडणूका लक्षात घेता जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी तात्काळ खर्च करण्यात यावे आशी मागणी काही सदस्यांनी माझ्याकडे केली असल्याचे ही आ. कल्याणशेट्टी म्हणाले.यावेळी पक्षनेता अण्णाराव बाराचारे , सदस्य भासगी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

    अकलकोट तालूक्यातील दुधनी ,मैंदर्गी, अकलकोट नगर परिषदा आणि पंचायात समितीवर भाजपाचाचं झेंड फडकेल. असा विश्वास आ.कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला आहे.