टेंभुर्णी येथे २०० जणांचे लसीकरण

    टेंभुर्णी : टेंभुर्णी तालुका माढा येथील ओम साईराज मंगल कार्यालयात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सुमारे दोनशे जणांचे लसीकरण गुरुवारी (दि.8) सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत करण्यात आले. टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद कुटे व ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात झाली.

    टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने- शेंडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता खोटे यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत योग्य नियोजनात पार पडले.

    यावेळी सरपंच प्रमोद कुटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी येवले पाटील  कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, वसंत येवले पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता खोटे, आरोग्य सहाय्यक मंदाकिनी गायकवाडस, आरोग्य सेविका मनिषा बैरागी, आशा पुरंदरे, औषध निर्माता सतीश लोंढे, चंद्रकांत शिंदे, सारिका जगताप, रेश्मा सुक्रे, आरती दाखले, ज्योत्स्ना खरात आदी उपस्थित होते.