बार्शीत ४९७ महिलांचे लसीकरण ; राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानचा उपक्रम

जवाहर रुग्णालय परिसरात असलेल्या या दवाखान्यासह शहरात झाडबुके कॉम्प्लेक्स, सिल्व्हर जुबिली हायस्कूल, गणपती मंदिर, भवानी पेठ, जिजामाता हायस्कूल आणि अभिनव हायस्कूलमध्ये महिलांसाठी लस उपक्रम राबवण्यात आल्याचे डॉ. सुधीर घोडके यांनी सांगितले.

    बार्शी : शहर व तालुक्यातील ४९७ महिलांनी आज बार्शीत कोविशिल्ड लस घेतली. रक्षाबंधन निमित्त राष्ट्रीय शहरी आरोग्य अभिानाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारी खास महिलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. सुधीर घोडके यांनी दिली.

    जवाहर रुग्णालय परिसरात असलेल्या या दवाखान्यासह शहरात झाडबुके कॉम्प्लेक्स, सिल्व्हर जुबिली हायस्कूल, गणपती मंदिर, भवानी पेठ, जिजामाता हायस्कूल आणि अभिनव हायस्कूलमध्ये महिलांसाठी लस उपक्रम राबवण्यात आल्याचे डॉ. सुधीर घोडके यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे, ईश्वर सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.