विठ्ठल मंदिर खुलं; रोज दोन हजार भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन

मंदिर समितीच्या वतीने काल बुधवारपासून २ हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शनव्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे.

राज्यातील मंदिरे खुली (Temple Reopen) करण्यात यावी यासाठी राज्यभर अनेक आंदोलने (Agitation) करण्यात आली. परंतु दिवाळी पा़डव्याच्या मुहूर्तावर अखेर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर (Vitthal-Rukmini Temple) भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच मंदिर समितीच्या वतीने काल बुधवारपासून २ हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शनव्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज दोन हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते. मात्र, नित्योपचार दैनंदिन सुरू राहिले असून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांसाठी दर्शनाकरिता खुली करण्यात आली आहेत.

मंदिर समितीकड़ून योग्य खबरदारी

मंदिर समितीकडून विठ्ठल- रूक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच मंदिरात आणि नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखले जाईल या संपूर्ण गोष्टीची खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांकरिता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ऑनलाईन बुकिंग केलेल्यांनाच प्रवेश

ऑनलाईन बुकिंग केलेल्या पासधारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी www.vitthalrukminimandir.org/home या संकेस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. त्याचप्रकारे असे आवाहनही मंदिर समितीच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.