कोरोनाच्या काळात ‘रात्रीस खेळ चाले’;  तालुक्यात अवैध वाहतूकीचे पेव

केडगाव : सध्या कोरोना हा संसर्ग जन्य रोग सुरु असताना व संपूर्ण देशात लाँकडाऊन असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते.

 तालुक्यात अवैध वाहतूकीचे पेव              

सोलापूर: सध्या कोरोना हा संसर्ग जन्य रोग सुरु असताना व संपूर्ण देशात लाँकडाऊन असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते.  हि वाहतूक बेकायदेशीर तर आहेच,  पण लाँकडाऊन मधील दिलेल्या सर्व नियमाला हरताळ पाळत कार्ड स्वरूपात वसुली होताना दिसत आहे.  तालुक्यातुन साधारणत: साडे तीनशे ते चारशे वाळुच्या गाड्यांची वाहतूक होत असते.  ग्रामीण भागातुन कोणत्याही प्रकारचा लिलाव झाला नाही.  लिलावाला बंदी असताना एवढ्या प्रमाणात वाहतुक होत असते, तर पुणे सोलापूर रस्त्यावर रात्रीच्या वेळी असणारे कर्मचारी नियम डावलून काम करत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे.  जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असेल तर त्या कार्ड धारकांची संख्या जास्त असल्याचे बोलले जात आहे, या कडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे, कर्मचारी कारवाई करायचे सोडून मलिदा लाटण्याचे काम करत असल्याची चर्चा आहे, या कडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का ? डोळेझाक करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.