आम्ही फक्त नारायण राणेंच्या आदेशाची वाट पाहतोय; राणे समर्थक आक्रमक

    सोलापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अक्षेपार्ह विधान केले. त्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात शेडको शिवसैनिकांकडून राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहरामध्ये देखील ‘जोडे मारो’ असे विविध आंदोलने शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनासंदर्भात राणे समर्थकही (Rane Supporters Aggressive) आक्रमक झाले आहेत. मंगळवारी जशास तसे उत्तर देण्यास आम्हीही खंबीर आहोत, असा इशारा राणे समर्थकांनी शिवसेनेला दिला आहे.

    सोलापुरातील कट्टर राणे समर्थक माजी नगरसेवक सुनील खटके हे आहेत. सोलापूरमध्ये होत असलेल्या आंदोलनाबात आपली काय प्रतिक्रिया आहे असे पत्रकारांनी विचारताच ते म्हणाले, आम्ही नारायण राणेंच्या आदेशाची वाट पाहतोय नारायण राणेंनी जे वक्तव्य केले आहे, ते फक्त राजकीय वक्तव्य आहे. त्याचा शिवसेनेच्या नेत्यांनी बाऊ केला आहे. यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांनी अनेकवेळा भाजपवर व नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदींना चोर देखील म्हटले आहे. तर यावर भाजपच्या नेत्यांनी असे बाऊ करून निषेध आंदोलन, रास्ता रोको केला नाही. ही राजकीय स्टंटबाजी बंद करावी. अन्यथा आम्हालाही आक्रमक व्हावे लागेल, असा इशारा राणे समर्थकांनी दिला आहे.

    दरम्यान, आम्ही नारायण राणेंच्या आदेशाची वाट पाहतोय, आदेश आल्यावर आम्ही देखील रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील सुनील खटके यांनी बोलताना दिला आहे.