दूधदर वाढीसाठी सरकारला रक्ताचा अभिषेक घालू ; राहुल बिडवे यांचा गंभीर इशारा

एकीकडे राज्य सरकारच्या आदेशाचा भंग होत आहे मात्र दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संघांवर कारवाई करण्याचे धाडस दुग्धविकास विभागाकडून होत नाही इतकेच नाही तर दूध संघावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे राज्यामध्ये दूध उद्योगाची उलाढाल सुमारे शंभर कोटी रुपयांचे आहे तर दूध उत्पादक १ कोटी २० लाख सरासरी आहेत

    अकलुज : दूधदर वाढीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने रस्त्यावर ते दूध ओतून सरकारविरोधी घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले .आज दुधाचे दर अठरा ते वीस रुपयेवर आले आहेत. हमीभाव सुद्धा मिळत नाही, अशी अवस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. सरकार दूध उत्पादकांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. कोरोनाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ती बसवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान राज्यकर्ते करत आहे. उसाप्रमाणे दुधाला पण एफआरपी असावी, जर सरकारने तातडीने दूध दरवाढ नाही केली तर पशुधन वाचणार नाही. कारण पाण्याची बाटली वीस रुपये आणि दुधाला दर १८ रुपये पाण्यापेक्षा दूध स्वस्त झाले राज्यात अनेक ठिकाणी प्रतिलिटर दहा रूपये दराने कमी भाव मिळत आहे. राज्य सरकारने परिपत्रक काढून ही खासगी व सहकारी दूध संघांकडून त्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. जर सरकारने तातडीने दूध दरवाढ नाही केली तर बेमुदत बंद आंदोलन करण्यात येईल, राज्यात दुध धंद्यात सोनाईचे दशरथ माने यांची फारच मक्तेदारी वाढली आहे. ते सांगतात तेवढाच भाव इतर दुध संघ देतात कारण अतिरिक्त दुध वाढले तर ते सोनाईला द्यावे लागते त्यामुळे कुठलाही दुधसंघ सोनाई विरोधात बोलत नाही. उलट सर्व दुध संघ आज एकत्र येऊन भाव पाडले आहे गाईच्या दुधाला तीस रुपये भाव असताना जाणूनबुजून भाव पाडण्याचे पाप सोनाईचे दशरथ माने यांनी केले, असा आरोप रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे यांनी केला.

    एकीकडे राज्य सरकारच्या आदेशाचा भंग होत आहे मात्र दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संघांवर कारवाई करण्याचे धाडस दुग्धविकास विभागाकडून होत नाही इतकेच नाही तर दूध संघावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे राज्यामध्ये दूध उद्योगाची उलाढाल सुमारे शंभर कोटी रुपयांचे आहे तर दूध उत्पादक १ कोटी २० लाख सरासरी आहेत दूध व्यवसाय तेजीत असला कि दूध कंपन्या चांगला भाव देतात मात्र मंदीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतात पशुखाद्यासाठी येणारा खर्च वाढला सरकी,गोळी,भुसा,ताम,मक्याचा भरडा ,ओलाचारा यांचे भाव गगनाला भिडले असताना दूध संघांनी मात्र १८ रुपये वर दुधाचे भाव आणलेत आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे जर दरवाढ नाही झाली तर पशुधन वाचणार नाही सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी आज रस्त्यावरती उत्तरला आहे दुधदरवाड नाही केली तर राज्यात एकाही मंत्र्याला फिरकु देणार नाही असा ईशारा रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे यांनी दिला यावेळी सनी पाटील,बापु रेडे,कुणाल निबाळकर,लखन गरड,डॉ सचिन नलवडे,निलेश काटे उपस्थित होते.