What Ajit Pawar and Jayant Patil said is not a lie! BJP's big leader on the path of NCP

जुने गडी घेवून नवा डाव मांडण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरु केली आहे. पंढरपूरमधील  भाजपचा एक बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. त्यामुळे त्यांचे हे भाकीत खरं होते की काय अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई :  जुने गडी घेवून नवा डाव मांडण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरु केली आहे. पंढरपूरमधील  भाजपचा एक बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. त्यामुळे त्यांचे हे भाकीत खरं होते की काय अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.

सोलापूरचे भाजप आमदार कल्याणराव काळे (BJP MLA Kalyanrao kale) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. त्याला कारण ठरलयं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचा पंढरपूर  दौरा.

या दौऱ्यानिमित्ताने शरद पवार आणि सोलापूरचे भाजप आमदार कल्याणराव काळे (BJP MLA Kalyanrao kale) एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. एवढंच नाही तर आमदार कल्याणराव काळे यांनी शरद पवार यांच्या वाहनातून सरकोली ते पंढरपूर असा प्रवासही केला.

एकच व्यासपीठ आणि एकत्र प्रवास यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजप नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीसाठी शरद पवार आपल्या जुन्या साथीदारांच्या शोधात असल्याचे तर्कही लढवले जात आहेत. पक्षात होणाऱ्या इनकमींग बाबात राष्ट्रवादीचे नेते करत असलेले दावे खरे ठरतील असाही अंदाज बांधला जात आहे.