Pandharpur elections; 19 candidates in the fray for one seat; Will NCP's Bhagirath Bhalke win or will BJP's Samadhan Avtade win?

भाजपा समर्थकांनी पंढरपूर पोटनिवडणुकीचा विजयी जल्लोष सुरू केला आहे. मात्र, अद्याप अधिकृत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. शेवटची म्हणजेच ३८ वी फेरी अजून बाकी आहे. मात्र, मतमोजणी संथ गतीने सुरू असल्याने समाधान आवताडे केंद्रावर पोहोचले आहेत.

    सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरु आहे.अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली.या निवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडे यांनी सहाव्या फेरीनंतर शेवटपर्यंत आघाडी घेतली. अद्याप एक फेरी बाकी असून ३७ फेरीअखेर भाजपाचे समाधान आवताडे यांनी ६०१० मतांनी आघाडी घेतली आहे. मात्र, ३८ व्या फेरीची मतमोजणी संथगतीने सुरू असल्याने अधिकृत अंतिम निकाल थांबला आहे. त्यामुळे, उमेदवार समाधान आवताडे यांनी मतमोजणी केंद्रात धाव घेतली आहे.

    भाजप समर्थकांचा निकालाआधीच जल्लोष

    भाजपा समर्थकांनी पंढरपूर पोटनिवडणुकीचा विजयी जल्लोष सुरू केला आहे. मात्र, अद्याप अधिकृत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. शेवटची म्हणजेच ३८ वी फेरी अजून बाकी आहे. मात्र, मतमोजणी संथ गतीने सुरू असल्याने समाधान आवताडे केंद्रावर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत. भाजपानेही विजय निश्चित मानला असून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. मात्र, अद्यापही विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे, पंढरपूर मतमोजणी केंद्रावर संभ्रमावस्था दिसत आहे.