बार आणि मॉल उघडता मग मंदिरं का नाही? देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सवाल

“मंदिर न उघडल्यामुळे मंदिराच्या आसपासच्या दुकानदारांची उपजीविका संपली आहे. त्याचप्रमाणे शाळा न उघडल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य बिघडत चालले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा आणि मंदिरे उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी.” अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

    मिशन बिगिन अगेन Mission Begin Again अंतर्गत महाविकास आघाडी सरकारने Mahavikas Aghadi government हॉटेल, बार व मॉल bars and malls open सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला. मॉलमधे प्रवेशासाठी शासनाने नियमावली देखील जाहिर केली आणि शॉपींग मॉल सर्वांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी ‘बार आणि मॉल उघडता मग मंदिरं का नाही?’ असा सवाल करत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर आणि शाळा उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी. मंदिरांमुळे अनेक लोकांचे जीवनमान विस्कळीत होत आहे. शिवाय शाळा न उघडल्यामुळे मुलांचे भविष्य उध्वस्त होत आहे.”

    फडणवीस सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला फक्त दारूच्या दुकानांची चिंता आहे. त्यामुळेच या सरकारने प्रथम दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. दारूच्या दुकानांसमोर जेवढी गर्दी असते तेवढी मंदिरांमध्ये होत नाही. यानंतरही राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला नाही.”