भोयरे ता.मोहोळ येथील महिला दिनाच्या कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सरपंच बाळकृष्ण साठे,संभाजी आवारे,उमा कवडे,रंजना कुलकर्णी,माधुरी माळी, ब्रह्मदेव फंड आदि 
भोयरे ता.मोहोळ येथील महिला दिनाच्या कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सरपंच बाळकृष्ण साठे,संभाजी आवारे,उमा कवडे,रंजना कुलकर्णी,माधुरी माळी, ब्रह्मदेव फंड आदि 

'महिला दिन'साजरा करुन उपयोग नाही ,तर महिलांसाठी काहीतरी ठोस करायला हवे."असे म्हणत नुतन सरपंच बालाजी साठे यांनी "यापुढे भोयरे गावात जन्मास येणात्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जातील ,"अशी घोषणा केली.

    मोहोळ : या गावात यापुढील काळात जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दोन हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जातील अशी घोषणा येथील नुतन सरपंच बालाजी साठे यांनी महिलादिनाच्या कार्यकमात केली. भोयरे(ता.मोहोळ)येथे ग्रामपंचायत,जि.प.शाळा व अंगणवाडी यांच्या संयुक्तविद्यमाने ८ मार्च हा जागतिक महिलादिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेचे पुजन ग्रा.पं.सदस्या माधुरी माळी व लक्ष्मी ताकमोगे यांच्या हस्ते करण्यात आले.

    ज्या महिलांना फक्त मुलीच आहेत त्यांचा गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी साक्षी पाटील,ज्योती थोरबोले ,स्वाती महाजन,संस्कृती चव्हाण प्रांजल पाटील,रंजना कुलकर्णी,अनिता सरदेशमुख ,उमा कवडे या महिलांनी व ग्रामसेवक सोमनाथ सोनवणे यांनी मुलांपेक्षा मुलीच कशा श्रेष्ठ आहेत ,यावर आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मार्गदर्शन करताना ‘महिला दिन’साजरा करुन उपयोग नाही ,तर महिलांसाठी काहीतरी ठोस करायला हवे.”असे म्हणत नुतन सरपंच बालाजी साठे यांनी “यापुढे भोयरे गावात जन्मास येणात्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जातील ,”अशी घोषणा केली.याशिवाय महिलांच्या सुविधेसाठी ग्रामपंचायत तर्फे सॅनिटरी नॅपकिन मशिन व इन्सोलेशन मशिन अंगणवाडी सेविकांकडे सुपूर्द करण्यात आली.

    कार्यक्रमास सदस्य ब्रम्हदेव फंड,माधुरी माळी,लक्ष्मी ताकमोगे, ग्रामसेवक सोनवणे, नेताजी कसबे,राजेंद्र पवार,शिक्षकवृंद,अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ व बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मुख्याध्यापक संभाजी आवारे यांनी केले,तर आभार रंजना कुलकर्णी यांनी मानले.

    अलीकडे महिलांवरील अत्याचार, मुलगी नको मुलगा हवा म्हणून होणारी स्त्री-भ्रूणहत्या अशा विकृत घटनांच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला दिन जगभरात साजरा करण्यात आला. मात्र भोयरे (ता. मोहोळ) या गावात, यापुढे जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजार रुपये फिक्‍स डिपॉझिट म्हणून ठेवले जातील, अशी घोषणा येथील नूतन सरपंच बाळकृष्ण साठे यांनी करून “मुली वाचवा’चा संदेश देत महिलांना महिला दिनाची मोठी भेट दिली.

    भोयरे ता.मोहोळ येथील महिला दिनाच्या कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सरपंच बाळकृष्ण साठे,संभाजी आवारे,उमा कवडे,रंजना कुलकर्णी,माधुरी माळी, ब्रह्मदेव फंड आदि