दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे

उजनीचे पाणी इंदापूर ला मिळाले पाहिजे अशी भूमिका सोलापूरचे पालकमंत्री यांनी इंदापूर तालुक्यातील एका गावात बोलताना माध्यमां समोरच मांडली व त्याचे पडसाद आता जिल्हाभर फिरू लागले आहेत. आपल्या वक्तव्यामुळे पालक मंत्री स्वतः अडचणीत आले असल्याचेही बोलले जात आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बदलले जाणार ? असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांसमोर उभा आहे. त्यांच्या वक्तव्याची ऑडिओ वायरल झाल्या मुळे पालकमंत्री भरणे मामा यांची भूमिका तरी आम्हाला समजली अशाप्रकारे ही बोलले जात आहे.

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणातील पाण्यावरून काही दिवसापूर्वी राजकारण चांगलेच तापले होते. याचे कारण म्हणजे उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी मंजूर करून घेतल्यामुळे निर्माण झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व विविध संघटनांनी सदर प्रकाराला विरोध दर्शवला प्रसंगी आंदोलन करून सरकारला तो निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद नको आपले मुंबई व इंदापूर बरे अशा प्रकारचे संभाषण असलेले ऑडिओ व्हायरल क्लिप सध्या सोशल मीडियावर फिरत असल्याने पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेविषयी सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

    दरम्यान उजनीचे पाणी इंदापूर ला मिळाले पाहिजे अशी भूमिका सोलापूरचे पालकमंत्री यांनी इंदापूर तालुक्यातील एका गावात बोलताना माध्यमां समोरच मांडली व त्याचे पडसाद आता जिल्हाभर फिरू लागले आहेत. आपल्या वक्तव्यामुळे पालक मंत्री स्वतः अडचणीत आले असल्याचेही बोलले जात आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बदलले जाणार ? असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांसमोर उभा आहे. त्यांच्या वक्तव्याची ऑडिओ वायरल झाल्या मुळे पालकमंत्री भरणे मामा यांची भूमिका तरी आम्हाला समजली अशाप्रकारे ही बोलले जात आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाणी मिळवण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय समीकरणे पक्के करण्याच्या नादात पालक मंत्री दत्तात्रय भरणे मोठ्या अडचणीत सापडले आहेत त्यांनी यासंदर्भात पत्रकारांच्या समोरच भूमिका मांडताना त्यांच्या आवाजातील वायरल ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर फिरत असल्याने व त्यामध्ये आपणास सोलापूर चे पालकमंत्री पद नकोच आपल्याला इंदापूर व मुंबईच बरी आहे. आपण तेथे काम करू मात्र उजनी धरणातून इंदापूर ला पाणी मिळाले पाहिजे अशी भूमिकाही मांडायला ते विसरले नाहीत. उजनीचे पाणी इंदापूरला नेण्यासाठी त्यांनी जो प्रकार घडवून आणला त्यासाठी सोलापुरातील शेतकरी व सोलापूरकर हे त्यांच्यावर चिडून असले तरी त्यांच्या वायरल झालेल्या ऑडिओ तील वक्तव्यामुळे याचा फटका आता येणाऱ्या काळात पक्षालाही बसणार का? अशा प्रकारची प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यासाठी आता नवीन पालकमंत्री पद कोणाला मिळणार व उजनीच्या पाण्यावरून शेतकरी गप्प बसणार का? हा येणारा काळच ठरवणार आहे.