कासेगावच्या यल्लमा देवीची यात्रा रद्द

पंढरपुर :  राज्यासह देशभरातील जोगती व मुरळी यांच्यासह सामान्य भक्तांचे दैवत असणार्‍या कासेगाव यल्लमा देवीची यात्रा यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली आहे.

पंढरपुर :  राज्यासह देशभरातील जोगती व मुरळी यांच्यासह सामान्य भक्तांचे दैवत असणार्‍या कासेगाव यल्लमा देवीची यात्रा यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली आहे.

कासेगाव येथे जागृत यल्लामा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने अनेक राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते ११ जानेवारी दरम्यान भरणारी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रे दरम्यान देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

यंदा प्रतीकात्मक स्वरूपात यात्रेचा सोहळा साजरा करण्यात येणार असून मंदिर बंद असल्याने भाविकांनी याठिकाणी यात्रेसाठी येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती. यानंतर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.