पतंजली योग समितीच्यावतीने कोरोना रुग्णासाठी योग व प्राणायाम शिबीर ; प्रत्यक्ष कोविड केंद्रात देणार प्रशिक्षण

हरिद्वार येथून रामदेव बाबा महाराज, साध्वी देवप्रिया हे या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होते रामदेव बाबा यांनी यावेळी अनमोल असे मार्गदर्शन केले.

    सोलापूर: पतंजली योग समिती, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व शहरात कोविड सेंटर येथे आजपासून म्हणजे २३ मे पासून खास करून कोरोना रुग्णासाठी योग व प्राणायम शिबीरास सुरुवात होत आहे.

    शनिवारी सकाळी जिल्हा नियोजन भवन येथे महापौर श्रीकांचना यनम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मनपा उपायुक्त धनराज पांडे, नगर अभियंता संदीप कारंजे,जि .प .मुख्यवित्त व लेखधिकारी अजयसिंग पवार,पतंजली योग समितीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला प्रभारी सुधाताई अल्लीमोरे, भारत स्वाभिमानाच्या जिल्हा महामंत्री व नगरसेविका संगीता जाधव, महामंत्री संतोष दुधाळ, पतंजलीच्या जिल्हा महिला प्रभारी सौ. सुजाता शास्त्री, जिल्हाध्यक्ष नितीन मोरे, जिल्हा युवा प्रभारी मोहन कुंभार आदींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.विशेष म्हणजे हरिद्वार येथून रामदेव बाबा महाराज, साध्वी देवप्रिया हे या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होते रामदेव बाबा यांनी यावेळी अनमोल असे मार्गदर्शन केले.