तरुण व बालके ही देशाचे भविष्य आहेत त्यांना वाचवणे गरजेचे आहे : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर 

लोक,लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम केले तर कोरोनाची तिसरी लाट आपण रोखू शकतो. याकरिता नागरीकांनी त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होतेय परंतु मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही कारण लोक आजार अंगावर काढत आहेत परिणामी मृत्यूची संख्या वाढत आहे.लोकांनी चाचणीसाठी समोर आले पाहिजे आणि लवकर उपचार घेतले पाहिजे त्यादृष्टीने ग्रामिण भागात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  आज सोलापूर जिल्हा परिषदेने कोविडच्या उपाययोजना आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पुर्वतयारी या विषयावर चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे सर्व सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे उपस्थित होते.

  यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले की आपण पाहिले की पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही जास्त तिव्र आहे. दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बाधीत झाला व कित्येक तरुण या लाटेत मृत्यूमुखी पडले आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तरुण व बालके ही देशाचे भविष्य आहेत त्यांना वाचवणे खूप महत्त्वाचे आहे. सन्माननीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन कोरोना विषयक शासनाचे सर्व नियम पाळण्यास लोकांना प्रवृत्त करावे. आपल्या बोलण्याचा पगडा लोकमनावर असतो त्यामुळे फरक निश्चितच पडेल.

  लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकणारे म्हणून आपण लोकांनी लोकांना प्रबोधन केले तर प्रशासनावरचा ताण निश्चितच कमी होईल. लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आम्हालाही आवडत नाही आम्हीही तुमच्यातलेच आहोत. लसीकरण केंद्रावर लिभार्थ्या व्यतिरीक्त इतरांनी गर्दी करु नये. असे मत तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.

  लोक,लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम केले तर कोरोनाची तिसरी लाट आपण रोखू शकतो. याकरिता नागरीकांनी त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होतेय परंतु मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही कारण लोक आजार अंगावर काढत आहेत परिणामी मृत्यूची संख्या वाढत आहे.लोकांनी चाचणीसाठी समोर आले पाहिजे आणि लवकर उपचार घेतले पाहिजे त्यादृष्टीने ग्रामिण भागात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.२५ मे रोजी ग्राम रक्षा समितीच्या सभा प्रत्येक गावात आयोजित केल्या आहेत सदर सभेस जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करावे अशी विनंती सीईओ स्वामी यांनी केली.
  यावेळी भारत आबा शिंदे यांनी आरोग्य विभाग व शिक्षकांनी कोविड उपाययोजनांमध्ये चांगले काम केले आहे परंतु महसूल विभागाने आपल्या कामाची गती वाढवण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.

  त्रिभुवन धाईंजे यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले. कुर्डुवाडी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी जे सूपर स्प्रेडर आहेत असे दुकानदार, भाजी विक्रेते, केशकर्तनालय चालक यांना प्राधान्याने लस देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी केली. यावेळी अनेक सदस्यांनी आपली मते मांडली. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये सन्माननीय सदस्यांनी मांडलेल्या सुचनांचा अंमलबजावणी मध्ये जरूर विचार केला जाईल व नवीन संकल्पना सुचवल्या बद्दल सदस्यांचे आभार मानले.